भारताच्या यातनांकडे किसिंजर यांचं लक्ष जाईल अशी कल्पना करणार्या भारतीयांना अमेरिकेच्या लेखी किती क्षुल्लक महत्त्व होतं, हे समजून आल्यानंतर विटंबना झाल्यासारखं वाटायला लागलं
किसिंजर आणि त्यांचा चमू हे भर पावसात उतरले असले, तरी त्यांच्याविरुद्धची डाव्यांची अनिवार्य निदर्शनं होतच राहिली. विमानतळावर पोलिसांपेक्षाही कमी संख्या असलेले निदर्शक काळे झेंडे फडकवून आणि ‘मृत्युदूत किसिंजर, परत जा.’ तसंच ‘खुनी किसिंजर, परत जा.’ असे फलक दाखवून घोषणा देत होते. अमेरिकी अभ्यागतांना उभ्या मोटारींमध्ये कोंबून वेगाने दूर नेण्यात आलं.......